पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन दिनानिमित्त विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभ कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या उपस्थितीत वरसोली येथे संपन्न झाला. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना दरवर्षी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हास्तरावर भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सत्यजित बडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित पशुवैध्यक संघटना व पशु चिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र या संघटनाच्या रायगड शाखेने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली होती. या मागणीची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. रत्नाकर काळे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैध्यक संघटना जिल्हा अध्यक्ष डॉ. मुकेश मर्चंडे, पशु चिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास चौलकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.