निजामपूर विभागातर्फे ना.भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार

निजामपूर विभागातर्फे ना.भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार

लाडक्या बहिणीचे पैसे फक्त एकनाथ शिंदेनी मंजूर केले कोण म्हणेल मी त्या खात्याची मंञी आहे त्यांचा काहीही संबंध नाही – ना.भरतशेठ गोगावले

✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-शिवसेनेचे कँबिनेट मंञी ना.भरतशेठ गोगावले यांचा त्यांच्या महाड मतदार संघातील निजामपूर येथे निजामपूर विभागातर्फे भव्य सत्कार कार्यक्रम हा रविवार दि. १८ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना.भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी पक्षाचे खा.सुनील तटकरे तसेच मंञी आदीती तटकरे यांचे नाव न घेता विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, आम्ही लोकसभेला इमानदारीत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून रायगड मधून युती सरकारच्या उमेदवाराचे काम केले. त्यांनी मात्र विधान सभेला आम्हाला पाडण्याचे षडयंत्र रचले होते.हे त्यांचे षडयंत्र माझ्या मावळ्यानी हाणून पाडले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समित्या,जिल्हा परिषद निवडणुका आपल्याला ताकीदने लढायच्या असून कार्यकत्याने आता पासूनच कामाला लागावे. फक्त मुंबई करांना आमची विनंती असेल गांवाला येऊन भावकी गावकीचे राजकारण करून नये, पक्ष संघटना देईल त्याच उमेदवाराला सहकार्य करावे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनीच लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर केले, एसटीमध्ये महिलांना हाफ तिकीट,तसेच 75 वर्षावरील महिला पुरूषांना मोफत तिकीट,लेक लाडकी या सर्व योजना एकनाथ शिंदे सांहेबानी मंजूर केल्या असून तुमच्या समोर त्या खात्याचा कोण येईल आणि म्हणेल की मी केले हे तर त्याचा काही संबंध नाही असे ना.भरतशेठ गोगावले यांनी आदीती तटकरे यांचे नाव न घेता टोळा हाणला.यावेळी कुंभार्ते,सांगी आणि साळवे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झाला. व्यासपिठावर प्रमोद घोसाळकर,अरुण चाळके,राजीव साबळे,विपुल उभारे, अविनाश नलावडे,रमेश मोरे, राजाभाऊ रणपिसे,संदीप जाधव, विलास शिंदे,संजय शिंदे, गणेश समेळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.निजामपूर येथे मंत्री भरत शेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.