न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम – वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी विशेष अभ्यासवर्ग आणि मनोरंजन शिबिर

42

संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्था-संघटनांनी या उपक्रमाला आर्थिक व भौतिक स्वरूपात सहकार्य करावे, जेणेकरून या मुलांपर्यंत अधिक प्रभावीपणे शिक्षण पोहोचवता येईल आणि समाजात सकारात्मक बदल घडवता येईल.

आंबाडी, वाडा: दसमाजातील वंचित, भटकंती करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) यांनी वाडा तालुक्यातील आंबाडी येथे १८ मे २०२५ रोजी एक विशेष उपक्रम राबवला.

या उपक्रमाअंतर्गत वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी मनोरंजनयुक्त अभ्यासवर्ग सुरू करण्यात आला. या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्या जीवनात स्थैर्य यावं आणि भविष्यात ते सक्षम, साक्षर नागरिक बनावेत, हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू आहे.

उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्था या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, नैतिक मूल्यांचे प्रशिक्षण व भावनिक आधार देत आहे. याशिवाय, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक खेळ, कथाकथन, गाणी, चित्रकला अशा विविध उपक्रमांची आखणी केली जात आहे.

या उपक्रमास संस्थेच्या संचालिका मा. अनिता खरात, अध्यक्ष मा. गणेश खरात, सचिव मा. महेश गडांकुश, पदाधिकारी मा. सुनील कांबळे, मा. चंद्रकांत सोनवणे, अध्यापिका मा. स्वप्नाली पवार यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतरित जीवनशैलीमुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर ‘न्यू प्रगती’ संस्थेचा हा प्रयत्न म्हणजे एक सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे.

संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्था-संघटनांनी या उपक्रमाला आर्थिक व भौतिक स्वरूपात सहकार्य करावे, जेणेकरून या मुलांपर्यंत अधिक प्रभावीपणे शिक्षण पोहोचवता येईल आणि समाजात सकारात्मक बदल घडवता येईल.