रक्तदानासाठी सदैव तत्पर रहा….विशाल निंबाळकर* *भाजयुमोच्या सेनापतींनी केले रक्तदान* *स्वेच्छा रक्तदानाचा २२ वा दिवस आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.

45

*रक्तदानासाठी सदैव तत्पर रहा….विशाल निंबाळकर*
*भाजयुमोच्या सेनापतींनी केले रक्तदान*

*स्वेच्छा रक्तदानाचा २२ वा दिवस आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.

रक्तदानासाठी सदैव तत्पर रहा....विशाल निंबाळकर* *भाजयुमोच्या सेनापतींनी केले रक्तदान*  *स्वेच्छा रक्तदानाचा २२ वा दिवस आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.
रक्तदानासाठी सदैव तत्पर रहा….विशाल निंबाळकर*
*भाजयुमोच्या सेनापतींनी केले रक्तदान*
*स्वेच्छा रक्तदानाचा २२ वा दिवस आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.

 

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर (चंद्रपूर ): -एकदा रक्तदान केले की पुन्हा ३महिन्याने रक्तदान करता येते.रक्तदान केले की अनेक आजारानां दूर ठेवता येते.म्हणून युवकांनी नियमित रक्तदान करावे.रक्तदानासाठी सदैव तत्पर रहा,असे आवाहन भजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.ते स्वेच्छा रक्तदान शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
येथील आय एम ए सभागृहात ३०मे पासून आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे स्वेच्छा रक्तदान शिबिर सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाले म्हणून ३० जून पर्यंत हे शिबीर चालणार आहे.रविवार (२०जून)ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या १८ प्रमुख कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कण्हेरकर यांची तर प्रमुख वक्ता म्हणून प्रमोद कडू यांची तर अतिथी म्हणून महापौर राखी कंचर्लावार, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ अनंत हजारे,पत्रकार जितेंद्र मशारकर,मित्र परिवाराचे डॉ मंगेश गुलवाडे,राजेंद्र गांधी,प्रकाश धारणे,सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,नगरसेवक संजय कंचर्लावार, छबू वैरागडे,प्रभा गुडधे,रामकुमार आकापेलिवार,भाजयुमो महासचिव प्रज्वलंत कडू,सुनील डोंगरे,प्रमोद क्षीरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सोपान कण्हेरकर यांनी भाजयुमोला सेवेच्या माध्यमातून मोठे करण्याचे आवाहन केले,तर प्रमोद कडू यांनी भाजयुमोच्या स्थापनेचा इतिहास सांगितला.आयोजनासह नियोजनाला महत्व असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी डॉ.गुलवाडे,विशाल निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाजयुमोचे प्रवीण घोटेकर,भूषण बांगडे, बंडू गौरकर, रामजी हरणे,निखील आक्केवार, नामदेव दडमल, अक्षय पारधी, लवली बारई ,संगम शेलकर, प्रतिक उराडे, अजय नागापुरे,हिमांशू गादेवार, शुभम गो होकार, आकाश ठाकूर, किर्तिष झाडे, चेतन सहारे, राजू निंबाळकर, रवी निंबेकर या सेनापतींनी रक्तदान केले.प्रारंभी सर्व मान्यवरांचे प्रज्वलंत कडू यांनी सर्व मान्यवरांचे शब्दसुमानाने स्वागत केले.प्रस्तविकात प्रशांत विघ्नेश्वर यांनी आयोजनाची भूमिका विशद केली.सर्व रक्तदात्यांना आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे तर्फे फेसशील्ड व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केक कापून विशाल निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा केला.कार्यक्रमाचे संचालन यश बांगडे यांनी केले तर सत्यम गाणार यांनी आभार मानले.