डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पोलादपूर शाखेच्या श्री सदस्यांतर्फे पोलादपूर तालुक्यातील रा. जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पोलादपूर शाखेच्या श्री सदस्यांतर्फे पोलादपूर तालुक्यातील रा. जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पोलादपूर शाखेच्या श्री सदस्यांतर्फे पोलादपूर तालुक्यातील रा. जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

✍संदिप जाबडे✍
🗞मीडिया वार्ता न्यूज 📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8149042267

पोलादपूर( रायगड) : – महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पोलादपूर येथील डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, कंपास इत्यादी शालेय साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने अध्यात्मिक व सामाजिक कार्याच्या समन्वयातून अंधाश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम,रक्तदान, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बसथांबा शेड बांधकाम, बंधारा निर्मिती, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थींवर्गासाठी वय व अधिवास दाखला इत्यादी विविध उपक्रमातून माणसाला माणसाशी, अध्यात्माशी व समाजसेवेशी जोडण्याचे अभूतपूर्व काम डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अखंड प्रेरणेतून व पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सर्वांना माहिती आहेच. या कार्याचा वारसा जपण्याच्या उद्देशातून पोलादपूर श्री सदस्यांनी पोलादपूर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद शाळा मधील १५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सडवली आदिवासी वाडीवरील जि प शाळेत विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी शालेय साहित्य प्राप्त झाल्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी झाल्याचे सांगून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. सडवली आदिवासी वाडीसह पोलादपूर न.प. कन्या शाळा क्र. १, काटेतळी, चोळई, देवपूर खडपी, मोरगिरी, दळवीवाडी, सडवली या पोलादपूर तालुक्यातील एकूण ९ राजिप शाळांमधील १५१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन १०० पानी व तीन २०० पानी वह्यांचे कंपासपेटी सह विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे अभिनव उपक्रम राबविल्यामुळे राजिप शाळांमधील मुख्याध्यापकांनी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here