महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता? एकनाथ शिंदेंसह १३ आमदार ‘नॉटरिचेबल’; काही आमदार घेऊन सुरत येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता? एकनाथ शिंदेंसह १३ आमदार ‘नॉटरिचेबल’; काही आमदार घेऊन सुरत येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता? एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉटरिचेबल'; काही आमदार घेऊन सुरत येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग.

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं.
शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.  दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी १२ वाजत बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार हजेरी लावणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे, तर ताज्या बातमी नुसार एकनाथ शिंदे सुरत येथील ली मेरीडिंन या हॉटेल मध्ये 13 आमदार आहेत.शिवसेना आमदारांच्या विधानपरीषद निवडणूकीतील फुटीने हे नाराजीनाट्य रंगल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचा भाजपा काही फायदा करून घेईल का ह्या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपा बहुतेक अविश्वास ठराव आणून मविआ सरकार पाडू शकते असा कयास बांधण्यास हरकत नाही.