देशाच्या राजकारणाची दिशा बदलली निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

देशाच्या राजकारणाची दिशा बदलली निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

देशाच्या राजकारणाची दिशा बदलली निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-मागील गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या राजकारणाची दिशा बदलल्याने राज्याराज्यांमध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना आज महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचे निष्ठावंत व कै.आनंद दिघे साहेब यांचे शिष्य कॅबिनेट मंत्री मा.एकनाथ शिंदे यांची सुरुवातच शिवसेनेतून झाली आणि बघता बघता ठाणे महानगरपालिकेचे गटनेते पासून ते आज मंत्री पर्यंत संपूर्ण प्रवास शिवसेनेच्या प्रवाहात झालेला असताना देखील अशी कोणती आपत्ती आली की स्वतःसह सहकारी आमदार यांनी बंड पुकारून शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रश्न एवढाच उद्भवतो की तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी आपली पक्षाशी असलेली नाळ प्रतिष्ठा पणाला लावून काम करतात आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात यासाठी गावागावात वाद निर्माण होतात आणि सखे सोयरे सखे वैरी होतात गावागावातील गटातटाचे राजकारणामुळे गावाचा विकास खुंटतो आणि राजकारणी आपली पोळी भाजून मोकळी होतात पहिल्यांदा निवडून येणारा आमदार हा जनतेच्या पैशातून निवडून येतो नंतर हाच आमदार कोट्याधीश होतो आणि जनतेला सलाम करण्याऐवजी जनतेची कामे मार्गी लावणे ऐवजी आपली तिजोरी कशा पद्धतीने भरेल पहिल्यांदा याचा विचार करतो आणि स्वतःला निवडून दिलेल्या जनतेला सलाम करण्यासाठी प्रवृत्त करतो ही डोक्यात गेलेली हवा लोकशाहीला घातक असून नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनतेचा वापर करतात नंतर त्याच जनतेला वाऱ्यावरती सोडून देतात हा प्रकार सर्व पक्षातील नेतेमंडळींनी चालवलेला आहे आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी पराकष्ट, वादविवाद, जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नाहीतर येणाऱ्या काळात निवडून आलेला राजा आणि निवडून देणाऱ्याला सजा अशी परिस्थिती होईल