विनयभंग आणि पॉस्को कायद्याच्या च्या क्रमात बदल
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महाराष्ट्रात विनयभंग आणि पॉक्सच्या आरोपांवर एफआयआर नोंदवण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांच्या (डीसीपी) परवानगीशी संबंधित त्यांच्या आदेशात बदल केले आहेत. अशा तक्रारी आल्यावर तत्काळ एफआयआर नोंदवावा, असा नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
यासोबतच तक्रारीबाबत शंका असल्यास किंवा पीडित व आरोपी यांच्यात जुना वाद असल्यास अशा प्रकरणांमध्ये डीसीपींची परवानगी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अनेक वेळा मालमत्तेच्या पैशाचे व्यवहार, परस्पर वादातून असे आरोप करून गुन्हे दाखल केले जातात.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केलेल्या परिपत्रकात खोट्या प्रकरणांचा हवाला देत विनयभंग आणि पॉक्स अंतर्गत एफआयआर नोंदवण्यापूर्वी डीसीपीची परवानगी घ्यावी, असे म्हटले होते. या आदेशाला विरोध सुरू झाला होता. या आदेशावर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्डपासून ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.