वीज कोसळून आईसह दोन मुलींचा मृत्यू

वीज कोसळून आईसह दोन मुलींचा मृत्यू

वीज कोसळून आईसह दोन मुलींचा मृत्यू

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर: अंगणात असलेल्या आईसह दोन मुलीचा अकस्मात मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास वरवट येथे घडली. त्यांचा मृत्यू अंगावर वीज पडल्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दुपारी अंगणात घरकामे करीत असलेल्या आईला दोन मुली कामात मदत करत होत्या. अचानक काही कळायच्या आत आई संगीता रामटेके (४०) सह रागिनी रामटेके (१६), प्राजक्ता रामटेके (१४) या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. याबाबत दुर्गापुर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. येथील ठाणेदार स्वप्निल धुळे लगेच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांचा मृत्यू वीज पडून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राजक्ता व रागिनी या दोन्ही मातोश्री विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.