महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी पाच झोन मध्ये सहायक गांधीबाग झोनमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत अशोक पाटील यांची नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली.

महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी पाच झोन मध्ये सहायक

गांधीबाग झोनमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत अशोक पाटील यांची नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली.

महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी पाच झोन मध्ये सहायक गांधीबाग झोनमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत अशोक पाटील यांची नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली.

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱

नागपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी पाच झोनच्या सहायक आयुक्तांच्या बदलीचे आदेश धडकले. यासह कार्यकारी अभियंता व एक उपअभियंत्याचीही बदली करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या बदल्यांमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
गांधीबाग झोनमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत अशोक पाटील यांची नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली. पाटील यांच्याकडे अतिक्रमण विभागाच्या प्रभारी उपायुक्त आणि स्मार्ट सिटीचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही जबाबदारी होती, मात्र नव्या आदेशात या जबाबदारीचा कुठलाही उल्लेख नाही.

लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांची बदली गांधीबाग झोनमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडे असलेले आसीनगर झोनचे अतिरिक्त प्रभार काढून लकडगंज झोनचा प्रभार देण्यात आला आहे. धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बडगे यांच्यावर लक्ष्मीनगर झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांना आसीनगर झोनचे सहायक आयुक्त बनविण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेला लकडगंज झोनचा अतिरिक्त प्रभार काढून घेण्यात आला आहे. नेहरुनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांना हनुमाननगर झोनची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान हॉट मिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे यांना वाहतूक अभियंता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक विभाग अभियंता असलेले श्रीकांत देशपांडे यांना नगररचना विभागाचे उपअभियंता बनवण्यात आले आहे. यासोबतच वंदे मातरम हेल्थ पोस्टचे नोडल अधिकारीचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.