राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथि निमित्याने आरोग्य शिबिर आयोजित
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–नाग भिड तालुका अंतर्गत येणाऱ्या नवेगाव पांडव येथील ग्रामपंचायतीत राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ शर्मिला रामटेके, डॉ प्रशांत पांडव,खोब्रागडे आरोग्य सेविका यक्ष आरोग्य मदतनीस बनकर यांची उपस्थिती होती.आरोग्य शिबिराचे निमित्याने नवेगाव पांडव येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून स्वतःला कोणता आजार आहे.याची खात्री करून घेतली यात बी पी, शुगर/मधुमेह आणि इतर आजाराची माहिती मिळाली यामुळे ग्रामस्थांना राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्याची संधी सरपंच सौ शर्मिला रामटेके यांचे निमित्याने नवेगाव पांडव येथील जनतेला मिळाली.यावेळी गावातील सेवानिवृत्त शिक्षक चुरहे सर,कोतवाल पांडुरंग रामटेके,ग्रामपंचायत कर्मचारी,विजय नव घडे,अतुल पांडव यांची उपस्थिती होती.