दैनंदिन योग अभ्यास मुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते

✍️सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :- जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आरोग्य संपन्न करणारे शास्त्र म्हणजे “योग”. दैनंदिन योग अभ्यासामुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते,असे प्रतिपादन प्रबोधन कौशल्य निकेतन नर्चरिंग लाईव्ह यांनी आज माणगांव येथे केले.आज दि.२१ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने टिकम भाई मेहता कॉलेज बामणोली रोड मैदान,माणगांव येथे अंकित रॉय प्रकल्प मॅनेजर,प्रेमकुमार सिंग योगा शिक्षक, सुरेश दळवी माणगांव मॅनेजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन कौशल्य निकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर संपन्न झाले, त्यावेळी प्रमुख अतिथी माणगांव तहसीलदार श्री. विकास गरुडकर उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

21 जून या “ जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने “वसुधैव कुटुंबकम्” या पार्श्वभूमीवर आधारित “One World One Family” हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे, हा वैश्विक उद्देश या मागे आहे. यानिमित्ताने योग अभ्यासाचे महत्वही त्यांनी विषद केले. सुरुवातीला प्रबोधन कौशल्य निकेतन नर्चरिंग लाईव्ह संस्थेने सर्वांचे वॉर्मअप व्यायाम घेतले.

त्यानंतर अंकित रॉय प्रकल्प मॅनेजर, सुरेश दळवी माणगांव मॅनेजर, नर्सिंग शिंदे, साहिल मोहिते, प्रेमकुमार सिंग, योगा शिक्षक, विशाल नागोठणेकर, देवयानी खानविलकर, ललिता दांडेकर, प्रज्ञा सावंत व डॉ. वसंतधार यांनी उभ्याने योगासने, बैठे योगासने, झोपून योगासने त्यानंतर प्राणायाम घेऊन ओमकार आणि शेवटी योग दिनानिमित्त संकल्प घेऊन प्रार्थना घेण्यात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.प्रास्ताविक प्रबोधन कौशल्य निकेतन नर्चरिंग लाईव्ह संस्थेचे माणगांव मॅनेजर यांनी केले, तर योगा चे महत्व आणि प्रात्यक्षिक प्रेम कुमार सिंग योगा शिक्षक यांनी आणि त्यांच्या योग साधकांनी केले.आभार प्रदर्शन देवयानी खानविलकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबोधन कौशल्य निकेतन चे सर्व अधिकारी कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा मार्गदर्शक आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास माणगांव, रोहा, कोलाड इंदापूर, महाड, पोलादपूर येथून मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here