महादेव मंदिर ट्रस्ट विश्वस्ताचा सर्पदंशाने मृत्यू
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : वरोडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र भटाळा येथील माँ भवानी मंदिर व हेमाडपंथी भोंडा महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रामचंद्र जाधव (60) यांचा बुधवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. रामचंद्र जाधव हे सकाळी अंघोळीसाठी स्नानगृहामध्ये गेले होते. अंघोळ करून बाहेर निघताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मे महिन्यात पत्नी सुमन जाधव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. दोन महिन्यांच्या आत पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 6.30 वाजता भटाळ्यातील यमराज भवनात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.