गढूळ पाणी कसे पिणार? नेरळ ग्रामपंचायत असक्षम! नागरिक चिंतेत….
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ :- रायगड जिल्ह्यातील सक्षम अशी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत भागात दिनांक २१ जून रोजी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे असा प्रश्न नेरळमधील रहिवाशांना पडला असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीतील नळ पाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याबाबत खळबक जनक दावा शिवसेना कार्यकर्ते अंकुश दाबणे यांनी केला आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत असून नेरळ ग्रामपंचायत भागात नळ पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. या योजनेमध्ये जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नेरळ गावातील पाणी हे शुद्ध समजले जाते.
पण नेरळ गावात आज २१ जून २०२४ रोजी नळा द्वारे आलेले पाणी पाहून सर्व ग्रामस्थांना धक्का बसला आहे. काल दिवसभर पाऊस असल्याने सकाळी पाणी काहीसे गडूळ येणार अशी अपेक्षा होती. मात्र नळाला आलेले पाणी हे अत्यंत गढूळ स्वरूपात होते जे पिण्या योग्यच नव्हते. नेरळ भागात कोणत्याही घरात आज नळाला गढूळपाण्याशिवाय कुठेही स्वच्छ पाणी आले नाही. त्यामुळे सर्व बहुसंख्या ग्रामस्थांनी आपले घरी आलेले पाण्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. ग्रामपंचायत मधील कारभाराबाबत नेरळ गावातील ग्रामस्थ यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाची धाव घेतली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले सचिव अंकुश दामणे यांनी थेट नेरळ ग्रामपंचायत जलशुद्धी केंद्रात जाऊन पाहणी केली असता त्याला धक्का बसला. नेरळ ग्रामपंचायत जलशुद्धी केंद्र नावापुरत्या सुरू असल्याचे चित्र पाहून ते अंचबित झाले. पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणारे आलम हे रसायन गेल्या दोन महिन्यापासून संपले असल्याची माहिती कामगारांनी दिली होती. त्या ठिकाणी कामगार काम करणाऱ्या आलम संपले असल्याचे पत्र एक महिन्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायत कडे दिले होते. टी.सीएल. उपलब्ध असून पाणी शुद्ध करण्याचे पंखे देखील बंद आहेत. पाणीपुरवठा योजना उध्वस्त विहीर असे असलेले पंप हाऊस मधील एक वीज पंप बंद असून दुसऱ्या पंप देखील बंद असल्याची मोठी पाणी कोंडी मुळे नेरळ ग्रामस्थांना होऊ शकते असे वाटते.
सरपंच यांना विचारले असता येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणी शुद्ध मिळेल असे आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषाताई पारधी यांनी दिले आहे. नवीन पाणी योजना चालू होणार आहे. वरील संबंधित अधिकारी वर्गास सांगितले आहे असे सांगण्यात आले आहे.