२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो
भिवंडी महानगरपालिकेने केले ११ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन…
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076
भिवंडी :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्रीडा विभागामार्फत २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भिवंडी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर (भा.प्र.से) यांच्या उपस्थितीत सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत स्व.राजय्या गाजेंगी हॉल, कोंबडपाडा भिवंडी येथे साजरा करण्यात आला असून योगा ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योगा हा भारताच्या प्राचीन परंपरेचा एक अमूल्य वारसा आहे. तसेच भिवंडी महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या योगा दिनानिमित्त कार्यक्रमास श्री अंबिका योगाश्रम ठाणे, शाखा भिवंडी यांचे मार्फत प्रशिक्षित योगा व गुरुंचे मार्गदर्शन योगासने प्राणायाम, ध्यान यांचे प्रशिक्षित आणि आरोग्य व मानसिक शांततेवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच
या योगा दिनानिमित्ताने कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त विक्रम दराडे, सहायक आयुक्त नितीन पाटील (क्रिडा) व सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी शरद कलावंत आणि क्रीडा विभाग प्रमुख मिलिंद पळसुले यांनी केले.