शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न
प्रशांत नार्वेकर
अलिबाग प्रतिनिधी
९१५८९९६६६६
अलिबाग:- शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक राजमाळा आमदार निवास येथे मा. आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आली होती. बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा व शहर संपर्कप्रमुख, विभाग व उपविभागप्रमुख, विभाग संपर्कप्रमुख, तसेच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, युवतीसेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि पक्षाचे विविध प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्यासह, स्थानिक स्तरावर पक्षाचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी महेंद्र चौलकर वरंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी काँग्रेस मधून व आशील कुमार ठाकूर माजी शहर प्रमुख ऊबाठा मुरुड तसेच गणेश मसाल यांनी शिवसेनेत जाहीरपणे पक्ष प्रवेश केला. आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले याप्रसंगी पक्ष वाढीसाठी तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आले.