35 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

35 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

35 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या
35 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

21/07/21घाटंजी
एका 35 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना घाटंजी तालुक्यातील घाटी येथील शेत शिवारात मंगळवार, 20 जुलैला संध्याकाळच्या दुपारच्या सुमारास उघडकीस आली. राहुल विलास पवार (वय 35, खापरी) असे मृत युवकाचे नाव आहे.
घाटंजी तालुक्यातील खापरी येथील राहुल पवार हा युवक कुटुंबियांसोबत राहत होता. मंगळवारी अचानक राहुलने घाटी येथील शेत शिवारात शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात घेताच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घाटंजी पोलिसांसह शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मात्र आत्महत्या का केली, हे अद्यापही कळाले नसून त्या युवकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.