मुंबईत, मागील 24 तासात 435 नविन कोरोनाबाधितांची नोंद तर 13 रुग्णांचा मृत्यु.

मुंबईत, मागील 24 तासात 435 नविन कोरोनाबाधितांची नोंद तर 13 रुग्णांचा मृत्यु.

मुंबईत, मागील 24 तासात 435 नविन कोरोनाबाधितांची नोंद तर 13 रुग्णांचा मृत्यु.
मुंबईत, मागील 24 तासात 435 नविन कोरोनाबाधितांची नोंद तर 13 रुग्णांचा मृत्यु.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी

मुंबई,दि.21 जुलै:- मुंबईत माघील 24 तासात 435 नविन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर 13 कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील अनेक दिवसा पासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसुन येत आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मागील 24 तासात फक्त 435 कोरोना वायरस बाधितांची नोंद झाल्याने मुंबई कोरोना समाप्तीच्या मार्गावर आहे अस दिसून येत आहे. मुंबईत 14 जुलैत पासून ते 20 जुलै 2021 पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर हा 0.06 टक्क्यांवर आला आहे. यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झालेली बघायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 15 हजार 739 कोरोना वायरस बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शास्त्रज्ञाच्या मतानुसार जगला कोरोनाची तिसऱ्या लाटेचा धोका आहे. असे वारमवार सांगीतल्या जत असताना मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ओसरताना दिसत आहे. आज रोजी मुंबईत एकूण 6 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत मुंबई क्षेत्रात एकूण 7 लाख 32 हजार 349 कोरोनावायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 7 लाख 8 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन आपल्या घरी गेले आहे. मागील 24 तासात मुंबईत 435 कोरोना वायरस बाधितांची नोंद झाली असून 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. 5 रुग्ण पुरुष व 8 रुग्ण महिला होते. 2 रुग्णांचे वय 40 वर्षा खाली होते. 8 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. उर्वरित 4 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते. मुंबईत आज पर्यंत 78 लाख 41 हजार 68 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून मागील 24 तासात 29 हजार 320 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 1 हजार 97 दिवसांवर गेला आहे. यामुळे मुंबईतील कोरोन परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.

प्रशासनाचे आहवान
मुंबई महानगर उपनगर मधील नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन प्रशासनाने केला आहे.