गोंदीया नराधम प्रियकराने आपल्या प्रेमीकेची धारदार शस्त्रांनी हत्या करुन तिचा मृतदेह फेकल्या जंगलात.

मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गोंदिया,दि.21 जुलै:- गोंदीया जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नराधम व्यक्तीने आपल्या प्रेमीकेची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्या प्रकरणी 26 वर्षीय नराधम प्रियकराला पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ढासगडकडे (पिपरखारी) जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला जंगलात एका 25 ते 30 वर्ष वयोगटातील एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे, अशी माहिती चिचगड पोलिसांना 23 जून रोजी सकाळी 10.50 वाजता मिळाली होती. चिचगड पोलीस आपल्या ताफ्यासह ढासगड येथील घटनास्थळी गेले असता, अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्यावरुन ओढत नेऊन जंगलात टाकण्यात आल्याचे दिसून आले. धारदार शस्त्रांनी तिच्या गळ्यावर, डोक्यावर वार करुन ठार मारण्यात आल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे संपुर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली होती. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या जोडप्यातील तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने आपल्या दोन मित्रांसह जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले.

प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. समीर असलम शेख वय 26, रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर असे प्रियकराचे नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण वय 35, रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर वय 25, रा. दुधा, मांगली, जि. नागपूर) यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.  चिचगड पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here