हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक
हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा :21/07/2021 जुन्या वादातून व्यक्तीला तिघांनी रॉडने मारहाण करीत हत्या करुन मृतदेह वरुड रेल्वे लाईनवर फेकून दिला. ही घटना 18 रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. असून मंगळवारी याचा उलगडा झाला असून तिन्ही आरोपींना दहेगाव पोलिसांनीअटक केली. दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे) (50) असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार, मृतक दिगांबर आणि आराेपी संदीप राऊत यांच्यात जूना वाद होता. तीन दिवसांपूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना आरोपी संदीप राऊत. राजू राऊत आणि किशोर राऊत यांनी रस्त्यात अडवून दिगांबरला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.तसेच त्याच्या डोक्यावर रॉडनेही मारहाण केली. दरम्यान, आरोपींनी जखमी दिगांबरचा मृतदेह वरुड रे. परिसरात असलेल्या रेल्वे पटरीवर फेकून दिला. याचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता ही सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली.
सेवाग्राम पोलीसात दिगांबर याचा मृतदेह वरुड रेल्वे परिसरातील रेल्वे लाईनवर फेकून देण्यात आला होता. ही बाब सेवाग्राम पोलिसांना समजताच पोलिसांनी अनोळखी मृतदेह मात्र, दहेगाव पोलिसांच्या कारवाईने हा मृतदेह दिगांबरचा असल्याचे समजले.