मुंबईतून एक आनंदाची बातमी, 1 ऑगस्टपासून महानगर पालिका करणार घरोघरी लसीकरण.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.21 जुलै:- मुंबईत कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसरी लाट येनार या भविष्य वाणीने लोकांचा मनात भीतिचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोना वायरस प्रतीबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लस देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वृद्ध लोकांन साठी एक आंनदाची बातमी समोर येत आहे.
75 वर्षांवरील नागरिक तसेच अंथरुणाला खिळलेल्या लोकांना घराबाहेर पडून लस घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने अशा लोकांसाठी मोफत घरोघरी लसीकरणाचा पर्याय ठेवला आहे. 1 ऑगस्टपासून ही मोहीम महानगर पालिकेमार्फत मुंबईत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाला दिली. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे खंडपीठाने काैतुक केले आहे. महानगर पालिकेच्या मोहिमेमुळे मुंबईकरांची सोय होणार आहे.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व अंथरुणाला खिळलेल्या विकलांग नागरिकांचे घरोघरी लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करत अॅड. धृती कपाडिया यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा प्रगती अहवाल 6 ऑगस्ट रोजी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.