नगर परिषद वानाडोंगरीत सिमेंट नालीला दोन महिन्यातच भगदाड, छोट्या वाहन धारकाचा होऊ शकतो अपघात.

✒ देवेंद्र सिरसाट ✒
हिंगणा तालुका प्रतीनिधी
📲9822917104📲
नागपूर:- वानाडोंगरी नगर परिषद मधील प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक ,अधिकारी यांच्या दुर्लक्षित पणामुळे कंत्राटदाराने नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापर करून या दोन महिन्यात तय्यार केलेल्या नालीला भगदाड पडले आहे.या वरून सिद्ध होते की नगर परिषद क्षेत्रा मध्ये सुरू असलेले बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून प्रत्येक प्रभागात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू आहे. या बाबत जिल्हाधिकारी नगर पालिका कार्यालयात बऱ्याच तक्रारी प्रलंबित आहे. त्यावर कारवाई व्हायला हवी असे सर्वच नेत्यांना वाटते पण पुढे येऊन आपण वाईट होता कामा नाही त्यामुळे पुढे येण्या करिता धजावत नाही. भ्रष्टाचारी कंत्राटदार व नगरसेवक यांच्या पाठीशी मोठा नेता असल्यामुळे, बेभानभ भ्रष्टाचार सुरू असल्याचे नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत. मुख्याधिकारी राहुल परिहार नगर परिषद कार्यालयाकडे भटकत सुद्धा नसल्याचा आरोप होत आहे.
वानाडोंगरी नगर परिषद चा पूर्ण कारभार हा हिंगणा नगर पंचायत मधूनच चलवल्या जात असल्याची चर्चा आहे. तिथेच मुख्याधिकारी परिहार कंत्राटदार व पदाधिकारी यांचेशी चर्चा करतात. त्यामुळे येथील तक्रारी बाबत कोणीही दखल घेत नसल्यामुळे नागरिक केवळ सोशल मीडिया मध्ये लपून छपून माहिती , आपले नाव पुढे न येण्याच्या अटीवर इकडून तिकडे पाठवत असतात पुढे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकी करीता नगरसेवक म्हणून निवडणूक लढण्या करीता किमान २०० सामाजिक व पक्षाचे कार्यकर्ते तय्यार आहेत .पण समस्या सोडविण्यासाठी व भ्रष्टाचार उघड करण्याकरिता कुणीही पुढे यायला तय्यार नाही. नुकत्याच नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागेवर निवडणूक जाहीर झाल्या नंतर हिंगणा तालुक्यात अनेक नेते बेडका सारखे निवडणुकीत उभे राहून समाजसेवा करण्यासाठी पुढे आलेले दिसत होते काही काळासाठी निवडणूक रद्द होताच पुन्हा बीडात गेलेले दिसत आहेत असेही त्रस्त नागरिक बोलुन दाखवत आहेत. वानाडोंगरी येथील भ्रष्टाचाराच्या बाबीकडे नव्याने आलेल्या जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी आशा काही नागरिक करीत आहे.