वर्धा-दत्तपूर मार्गावर झाडं तोडण्यासाठी 3 हजार स्वाक्षरींचे पालकमंत्री केदारांना निवेदन.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा दि.21 जुलै:- सेवाग्राम तसेच वर्धा-दत्तपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी झाडे ही महात्मा गांधींनी लावण्यात आल्याचे दाखले देत 3 हजार स्वाक्षरीचे निवेदन काँग्रेस नेते शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिले. ते तोडू नये यासाठी गांधीवादी संघटनांनी या वृक्षतोडीला विरोध केला. मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री व बांधकाममंत्र्यांना भेटून वृक्षतोडीवर स्थगिती आणली होती. परंतु, पर्यावरण विभागाने बांधकाम विभागाला सादर केलेल्या अहवालात त्या झाडांचे वय 50 वर्षाचे असल्याचे स्पष्ट केले. यावरुन महात्मा गांधी यांच्या हस्ते ही झाडे लावण्यात आली नसल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे रस्त्याच्या मधोमध येणारे झाडे तोडून रस्ता मोकळा करावा यासाठी वर्धा व सेवाग्राम परिसरातील 3 हजार नागरिकांच्या स्वाक्षर्याचे निवेदन पालकमंत्री सुनील केदार यांना भेटून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे व माजी सचिव प्रवीण हिवरे यांनी दिले. यावेळी पालकमंत्री केदार यांनी रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे तोडण्याच्या सूचना देत रस्त्याच्या कडेला 10 पट झाडे लावण्याचे आदेश दिले.