सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्याला काय महत्त्व ?

65

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्याला काय महत्त्व?

 

रितेश गाडेकर

मंगरूळपीर शहर प्रमुख

मो:8698143534

वाशिम जिल्ह्यातील सापळी या गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार यांनी उपस्थित केला प्रश्न.शासनाने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला पण ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व मागच्या वेळी भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आणि त्या वेळी झालेल्या बहुतांश ग्रामपंचायत मध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एका गटाचे निवडुन आले.

परिणामी दोन गटात सतत वादामुळे तालुक्यात अनेक गावा गावात विकास कामे थांबले असे दिसून आले जनतेतून निवडून आल्यावर सरपंचांनी मनमानी पणाने गावांचा कारभार करत कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्या ना विश्वासात न घेणे सदस्या ना महत्व न देणे हम करे सो कायदा.

स्वतः सरपंच ग्रामपंचायत जो कोणी कर्मचारी वर्ग असेल त्यांना हाताशी धरून विकासाच्या नावाखाली गुत्तेदारी करून मलीदा लादण्यात यशस्वी झाले ग्रामपंचायत च्या अनेक निर्णय प्रक्रियेतून सदस्या ना दुर ठेवले जात असल्यास सदस्या ना महत्व उरत नाही यामुळे निवडुन आलेल्या सदस्या मध्ये मोठी उदासीनता पाहण्यात मीळत आहे याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला होता.

परंतु सरकार बदलताच शिंदे फडणवीस नविन सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला यामुळे अनेक सदस्या मध्ये नाराजीचा सूर दिसुन येत आहे . सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न या मुद्यांबाबत ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मुद्दा पत्राद्वारे मांडणार आहेत.