माणगाव तालुक्यातील डॉ. नितीन मोदी यांचा ३५ वर्षांचा अविरत वैद्यकीय सेवेचा प्रवास

55

डॉ. नितीन मोदी
मु.पो. विळे, ता: माणगाव, रायगड
संपर्क क्रं: ९४२११६६३५८ / ८९८३७९५११५

माणगाव तालुक्यातील नामांकित डॉक्टर नितीन मोदी यांना विळे येथे दवाखाना सुरु करून २०२२ साली पस्तीस वर्षे पूर्ण झाली. पदवी घेऊन शहरात दवाखाना सुरु करूनभरमसाठ कमाई करण्याऐवजी डॉक्टर नितीन मोदी यांनी विळे गावामध्ये आपला दवाखाना सुरु केला. आज निजामपूर आणि विळे पंचक्रोशीतील साठ / सत्तर गावांतील जनतेला अल्प दरात गेल्या ३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.

डॉक्टर नितीन मोदी यांचे वडील धनाजी भाई मोदी हे एक स्वातंत्र्यसैनिक होते. अर्थातच वडिलांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर मोदींनी पुढे चालविला आहे. रात्र-दिवसाचा विचार न करता, कोविडसारख्या गंभीर परिस्थितीमध्येसुद्धा गावागावात जाऊन डॉक्टरांनी लोकांची सेवा केली आहे. वैद्यकीय क्षेत्रांसोबतच डॉक्टर नितीन मोदी यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे काम केले आहे.


डॉक्टर नितीन मोदी यांच्यामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
रक्तदान शिबीर + प्राथमिक आरोग्य शिबीर + ह्दय तपासणी शिबीर + नेत्र तपासणी शिबीर


आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रवासाबद्दल डॉक्टर नितीन मोदींनी व्यक्त केलेले आपले मनोगत

 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)


 

संपर्क: डॉ. नितीन मोदी
          (L.C.E.H)
          ९४२११६६३५८ / ८९८३७९५११५


पत्ता: मोदी क्लिनिक
        मु.पो. विळे, ता: माणगाव, रायगड
वेळ: सकाळी ९ ते रात्री ९
        रविवारी बंद