त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगाव
मालेगांव नगरपंचायत च्या
कचरा गाडीने धक्का दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 14 जुलै रोजी घडली होती. त्या संदर्भात गाडी चालका विरुद्ध आज दिलेल्या फिर्यादीवरून मालेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
घटनेची हकीगत अशी की, फिर्यादी गणेश नामदेव मानमोठे यांनी 20 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार त्याचे काका हे 14 जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजताचे सुमारास विक्रम गणपत मानमोठे वय 85 वर्ष हे येथील नवीन मालेगांव मधे लहुजी पुतळ्या जवळ डेअरी वरून दुध आणण्यासाठी जात होते तेव्हा नगरपंचायत ची कचरा गाडी क्रमांक एमएचMH 37 T 1473 चा चालक अनिल हिंमत करवते रा मालेगांव याने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने अचानक मागे घेतले . त्यामुळे गाडी मागे असलेले फिर्यादी गणेश मानमोठे याचे काका विक्रम मानमोठे यांना जोरदार धडक लागली त्यामधे ते गंभीर जखमी झाल्याने मरण पावले. त्या प्रकरणी चालक अनिल करवते याचे विरुद्ध कलम 279, 304, अ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शना खाली पी एस आय नारायण जाधव हे करीत आहेत. ✍