नळाद्वारे २४ तास जलसुविधा देण्याचे नियोजन

Jiनळाद्वारे २४ तास जलसुविधा देण्याचे नियोजन

नळाद्वारे २४ तास जलसुविधा देण्याचे नियोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /वाशिम

वाशिम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवरून.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पाणी पातळी वाढली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे सात दिवस २४ तास पाणी सुविधा पुरविण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी स्थानिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले. जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे उद्घाटन झाल. याप्रसंगी ते बोलत होते. लाखाला येथील तिरुपती लॉन्स येथे प्रमुख संसाधन संस्था कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील ज्या गावातील पाणी पुरवठा योजनांचा आराखडा मंजूर आहे, अशा एकूण १५ गावांतील ७५ लोकांच्या ग्रामस्तरीय ४ दिवसांच्या मिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर दस्तापूरचे सरपंच विश्वनाथ आटपाडकर, उस्मान खान, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अजजानन वेले, राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे विभागीय सल्लागार अरुण रसाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता निखिल देशमुख कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे संचालक नाफडे यांची उपस्थिती होती. चंद्रकांत ठाकरे म्हणाले, जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, या माध्यमातून लोकांना पाण्यासोबत योजना चालविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. जलजीवन मिशनचे मनुष्यबळ विकास सल्लाजार शंकर आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. कृषी विकास प्रशिक्षण समन्वयक सुदर्शन यांनी आभार मानले.✍