माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांचे निधन
दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो: 9271723603
बुधवार, दि.२० जुलै २०२२ रोजी सकाळी ६ वाजता माणगाव येथे हृदयविकारा च्या तिव्र झटक्याने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने वाटवे कुटुंबियांबरोबरच माणगाव पोलिस
ठाणे व मित्र परिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे.
जितेंद्र वाटवे हे शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. माणगावात ते आपल्या स्वभावामुळे सर्वांनाच परिचित होते. नुकतीच त्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
पदावरून पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती. बुधवारी सकाळी ६ वा. त्यांचे निधन झाल्याची माहिती माणगाव तालुक्यासह रायगडजिल्ह्यात सर्वत्र पसरताच अनेकांनी त्यांच्या वाकडाई नगर माणगाव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
१९ जुलै रोजी रात्री ड्युटीवर असताना त्यांच्या छातीत अचानक कळ आल्याने त्यांना माणगाव मोरबा रोडवरील अल्फा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांची अंत्ययात्रा माणगांव मधील वाकडाई नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून माणगाव पोलीस ठाण्याच्या मागील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी रायगड पोलीस दलाकडून सशस्त्र सलामी देण्यात आली यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह रायगड पोलीस दलातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.