हिंगणघाट येथील एकाच कुंटूबातील पुरात अडकलेल्या १० जणांची पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सुटका 

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधि.  

 मो: 9096817953

नागपुर .नांद उमरेड विधानसभेत भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावाजवळील नांद नदीवर दिनांक १७.०७.२०२२ रोजी ०२.१५ वा. सुमारास ऐजाज खान गुलाम हुसैन रा. हिंगणघाट यांचे कुंटूबातील एकुण १० सदस्य ०२ वाहनाने ब्रम्हपुरी येथे उमरेड – गिरड मार्गे हिंगणघाट जात असता चिखलापार येथे नदीवर पुराच्या पाण्यात वाहनासह अडकले होते. त्यांनी ११२ ला कॉल डायल करून मदत मांगितली असता पोलीस स्टेशन उमरेड व भिवापूर येथील अधिकारी व कर्मचार्यांनी बेसुर गावातील नागरीकांच्या मदतीने आपला जिव धोक्यात टाकुन पाण्यात मोठा दोर टाकुन व स्वतः पाण्यात उतरून वरील सर्व दहा लोकांना सकाळी ०४.३० वा. सुखरूप पाण्याच्या बाहेर काढुन त्यांचा जीव वाचविला.

त्याबद्दल आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री Devendra Fadnavis जी यांच्या हस्ते बेसुर गावातील पोलीसांना मदत करणारे नागरीक सर्वश्री जितेंद्र धोटे, विशाल चौधरी, निरंजन डंबारे, अंकित कुबडे, खोंडेश्वर शिंगारे व ही उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी / कर्मचारी सर्वश्री शरद भस्मे, ईश्वर जोधे, रविंद्र लेंडे, दिपक जाधव, नितेश राठोड, पंकज बट्टे यांचा सत्कार करण्यात आला.

मला अभिमान आहे आपल्या क्षेत्रातले नागरीक व अधीकारी/कर्मचारी लोकहीताची भावना जोपासून स्वताहच्या जिवाची पर्वा न करता इतरांसाठी धाऊन येतात हे खरे अभिनंदनास पात्र आहेत, सर्वांचे पुनशः अभिनंदन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here