कार्यतत्पर माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने नागरिकांचा रस्ता झाला खुला

✍️संतोष आमले
रायगड ब्युरो चीफ
📱 9220403509

पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील नाल्याजवळ झाड तुटून पडल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी मा.नगरसेवसक राजू सोनी यांना माहिती देताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी यांचे आभार मानले.
पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील मेघजी मणजी नाल्याजवळ खूप भले मोठे झाड तुटून पडले होते. त्यामुळे येथील नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता.त्यामुळे येथील रहिवाशांनी मा.नगरसेवसक राजू सोनी यांना फोन केला.त्यांनी त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना तेथे जाण्यासा सांगितले.ते तेथे जाऊन पाहणी करून राजू सोनी यांना सांगितले.तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई यांनी तात्काळ महानगरपालीकेच्या अग्निशमक दलाचे अधिकारी संदीप पाटील यांना सांगितले.पाटील यांनी लगेचच त्यांचे कर्मचारी पाठवले.व ते झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला.त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी, मंदार देसाई व अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे आभार मानले.
फोटो : राजू सोनी यांच्या प्रयत्नाने नागरिकांचा रस्ता झाला खुला