सलंगटोला येथिल बौद्ध समाज १०महिन्यांपासून बहिष्कृत असून प्रशासनाचे डोळेझाक

सलंगटोला येथिल बौद्ध समाज १०महिन्यांपासून बहिष्कृत असून प्रशासनाचे डोळेझाक

सलंगटोला येथिल बौद्ध समाज १०महिन्यांपासून बहिष्कृत असून प्रशासनाचे डोळेझाक

ग्रामीण पत्रकार🖋️सौ.रेखा गजभिए 🖋️
8698693351

मौजा सलंगटोला येथिल बौद्ध समाज बांधव पिढ्या न पिढ्या बुध्दिष्ठ व आंबेडकरी कार्यक्रम त्यांच्या गल्लीत करत आलेत पण बौद्ध समाज गल्लीत सिमेंटी रोड व नाली बांध काम सुरु झाल्याने १४एप्रिल२००४चा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह जवळील हनुमान मंदिर येथे समस्त गावकर्याच्यां सहकार्याने करन्यात आला आणि कार्यक्रम हि फारच छान झालं पण येथिल काही मनुवादी नेतागिरी करणांर्या नां बुध्दिष्ठ व आंबेडकरी कार्यक्रम “डोळ्याला खुपणारं आणि जीव जाळणारं”असल्याचे सांगुन असे कार्यक्रम नेहमी नेहमी मंदिरात करता येणार नसल्याचे बोलले
त्यानंतर ६डिसेबंर२००४ डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस चा कार्यक्रम आताचा गणपति चौकात करण्याचे ठरले आणि सबंध गांव-समाज एकत्रित येवून कार्यक्रम साजरा केले असता ईथेही तिच गोष्ट बोलली गेली या सर्वांमध्ये बौद्ध समाजांस खुप वाईट वाटले कि एकते चा दंभ भरणारे आज आपली जात जपत बौद्ध समाजांस निच, तुच्छ, हिन आणि संख्येने कमी आहेत म्हणून गुलाम समजत होते,वाट्टेल ते बोलत होते
बौद्ध समाज बांधव हे खपवून घेण्यास तैयार नव्हते म्हणून “धम्म चक्क प्रवत्तन दिन”२००५ला गट क्रं २७५/१६वरिल आराजी ३.५२हे आर जागेत बौध्दांच्यां घरां समोर करण्यात आले मात्र ईथेही गांव-समाज नाराज असल्याचे समजले
वर्ष २००५पासुन बुध्दिष्ठ व आंबेडकरी कार्यक्रम गट क्रं २७५/१६वर सुरु तर झालेत मात्र कार्यक्रमांत अनियमित असल्याने बौद्ध समाज बांधव म्हणत कि कार्यक्रम स्थळी आपली निशानी असेल तर कार्यक्रम नियमित होतील आणि हे बरोबर ही होते म्हणून वर्ष २०१०”धम्म चक्क प्रवत्तन दिन”ला “धम्म ध्वज”रोवण करण्यात आले मात्र येथिल जातिवादी मानसिकता असणार्या लोकांनी ध्वज व खांबाचे तोड़फोड़ व नासधुस करून बौद्ध समाजांस गावांतच काय तर कुठेच जागा नाही असे चिथवण्यात आले कार्यक्रम करायचे असल्यास आपल्या घरी,वाड्यात किंवा शेतात करा असे पुन्हा चिथवण्यात आले
त्यानंतर कार्यक्रम तर आणखीच जोमात करण्यात आले पण प्रत्येक वेळी कार्यक्रमांची परवानगी घेण्या करिता आणि जागेची मागणी करिता साखरिटोला ~आमगांव ~सालेकसा असा प्रवास करताना संपूर्ण दिवस जायचा मात्र तालुक्यातील अधिकार्यानीं आमची दखल कधिच घेतली नाही प्रत्येक वेळी फक्त बौद्ध समाज कार्यक्रमांची परवानगी घेते पण मौजा सलंगटोला येथिल ओबीसी नां कुणाच्याही परवानगी ची गरज नसायची सगळ मनमर्जी ने होते थे चालते पण बौद्ध समाजांस विना परवानगी काहीच करता येणार नसल्याचे तालुक्यातील अधिकार्यानीं बजावले तेव्हा मात्र वाटलं कि जातिभेद तर अधिकारी च पसरवतात मग सामान्य लोकं काय करणार तरी ही आम्ही आज पर्यंत हार मानलेली नाही आम्हाला तथागतां वर पुर्ण विश्वास आहे आमच्या कष्टाला ते नक्कीच न्याय देतील
हयाच विश्वासांवर आम्ही कार्यक्रम साजरा करत आलोत पण आता मनुवादी, जातिवादी मानसिकता असणार्या नेतागिरी करणांर्या लोकांनी एवढी मोठ्ठी जागा असुन ही नेमक्या बौद्ध समाज कार्यक्रम करतात त्यांच जागी कधी मोठ मोठ्मोठ्ठाली लाकड टाकण्यात आले,तर कधी सिमेंटी पोलही टाकण्यात आले वेळो वेळी त्रास देण्यास कमी पडले नाही म्हणून कि काय आता तिथे चक्क धान खरीदी केंद्र (सोसायटी (सातगाव)) उभारले आणि त्यांना एक एकर जागेचा ठराव हि फक्त वर्ष भरातच ग्रां प कारूटोला मार्फत पास ही करून घेतले ईथेच अहो आश्चर्यम् ना तहसीलदार ची गरज ना उप-विभागिय अधिकारी ची आवश्यक ना जिल्हाधिकार्याची विचारपूस संख्येने जास्त असल्याचे गैरफायदा घेवून आपले खिसे भरणेसाठी व कमिशन खोरि करणेसाठी सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत,मुलांच्या खेळण्याच्या मैदानालाहि सोसायटी चा विळखा फासला तेव्हा ना मैदानात खेळणार्या मुलांनी,ना त्यांच्या आईबापानीं,ना गावातील शहाण्या व्यक्ति ने कुठलीच हरकत (दखल)घेतली नाही😔
मात्र बौद्ध समाजाला त्यांच्या कार्यक्रमांची जागा न देता ५०*३०sqft जागा सालेकसा येथिल ठानेदार मां डुनगे सर यांनी मिळवून दिली आम्ही ईथेही खुस होतो कि किमान आमची दखल घेत समाजांच्या हक्काची जागा मिळाली म्हणून पण हे सुख जास्त दिवस टिकले नाही आणि मौजा सलंगटोला येथिल जातिवादी मानसिकता असणार्या लोकांनी ५०*३०sqftजागा सोडून आवार भिंत जबरिने केले आता ती जागा बौद्ध समाजांसाठी विवादित आहे कारण
१)५०*३०sqftला लागूनच कास्तकारांसाठी पांदन आहे जर आम्ही हि जागा कार्यक्रमां साठी घेतली तर बुद्धिष्ठ व आंबेडकरी कार्यक्रमांत शिल आचरणांचे देवाण घेवाण करण्यास येणार्यां उपासकांना रब्बी/खरिप हगांत येणार्यां कार्यक्रमांत अळथडा येईल विहार नसल्याने व जागा खुपच कमी असल्याने उदा.(खरिप)धान कापणी मळणी साठी जाणारे वाहन त्यांच वेळी२६/११संविधान दिवस आणि६डिसेबंर(डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस) येत आसल्याने वंदना करतांना वारंवार उठावें लागेल हे बौद्ध समाजांस मान्य नाही
२)अगदी पांदन ला लागूनच हिंदू चे आस्था असलेले नाग मंदिर आहे हे ही गट क्रं २७५/१६मध्येच आहे ते सगळ्यांना चालतं कुठेच दगळ ठेवलं कि देव तैयार ना हरकत दाखवायची कुणाची मजाल
जर आम्ही हि जागा कार्यक्रमां साठी घेतली आम्ही गावठी लोकं आम्हाला बुद्ध -धम्मांच अ आणि ब हि येत नसल्याकारणे बाहेरिल धम्म,शिल आचरणांचे देवाण घेवाण करण्यास येणार्यां लोंकात मग तो कोणत्या ही जाति-धर्मांचा असो वा लहान किंवा मोठा असो, स्त्री-पुरुष किंवा चांगला-वाईट वृत्ति ची व्यक्ति त्या मंदिरा त काही उपद्रव केलंग तर हे प्रकरण स्थानिक बौद्ध समाज बांधवांनवर उलटेल
३) बुध्दिष्ठ व आंबेडकरी कार्यक्रम येथिल ओबीसी च्यां डोळ्यात खुपणारं आणि जीव जाळणारं असल्याचे खुद्द ग्वाही देणारे ओबीसी च्यां घरां सामोरासमोर कार्यक्रमां ची जागा असल्याने चिढून बौद्ध समाजातील लहान किंवा मोठा व्यक्तिस ईजा (घातक)पोहचवू शकतात यात तिळमात्र शंका नाही
४) ओबीसी नां बौद्ध समाजा प्रती चिढ़ असल्याने जानुन वाद वाढावे या हेतुने त्या जागेत लहान मुलांस शी ला बसवने, डायपर्स/ॲपडस् टाकणे,घाण कचरा टाकणे स कमी करणार नाही म्हणून च त्या जागेची कुणीही (ओबीसी)जबाबदारी घेण्यास तैयार नाही असे ना अनेक कारणे असल्याने बौद्ध समाज ती जागा घेण्यास तैयार नाही आणि तिथे अजुनही कुठलेच कार्यक्रम केले नाही कारण जागा खुपच थोडकि व घाणेरडी (सांडपाणी असल्याने)
असो,दिनांक२५/०५/२०२२ला हातात असलेले ग्रांम पंचायत ठराव घेवून मा तहसीलदार साहेबांची परवानगी घेवून दि३०/०५/२०२२ला “धम्म ध्वज “बौध्दांच्यां घरां समोर रोवन केले असता कार्यक्रम उरकल्या नंतर संध्या ७:००वा बौद्ध समाजातील लोकं घरी परतल्यावर सबंध गांव-समाज एकत्रित येवून पुन्हा “धम्म ध्वज”व खांबाचे तोड़फोड़ व नासधुस करून तसेच श्री नरेश जी गजभिये (डेकोरेशन वाले)रा कारूटोला यांचे सामियाना,मेटी व८ खांबाचे तोड़फोड़ व नासधुस करून बरेच नुकसान केले व बौद्ध समाजांस “दुसरी खैरलांजी”घडविण्याचे चिथवण्यात आले मात्र येथिल स्थानिक पोलिस व तालुक्यातील अधिकार्यांसमोर बौद्ध समाजांस व समिति सर्व पदाधिकार्यास मारहान करणार बोलले तरीही येथिल प्रशासन फक्त बघत बसला कोणीही कुठलीच कार्यवाही करत नसल्याने आम्ही निराश झालोत आमचा तालुक्यातील प्रशासनावरील विश्वास च राहीला नाही म्हणून मां उप विभागीय अधिकारी देवरी यांचे कड़े व मां जिल्हाधिकारी म्याम यांचे कड़े वेळोवेळी जागेची मागणी करत आलोत पण आमची दखल कुणीच घेतांना दिसले नाही मात्र दिनांक०९/१०/२०२२ला आम्ही (सर्व बौद्ध समाज) बहिष्कृत ठरलो ओबीसी गांव-समाजाने बौद्ध समाजातील लोकास आपल्या घरी किंवा शेतात कामावर घेण्यास मज्जाव केला व खाजगी व सार्वजनिक कार्यक्रमात बोलावण्यास बंदी आणली आणि त्यांच्या ही घरी किंवा शेतात कामावर जाण्यास मनाई करण्यात आले हे नियम न पाळणार्यास ५०००/-₹सक्ती चे दंड आकारण्यात आले
यांचे सबळ पुरावे ही आम्ही देतो तरीही एवढ्या गंभीर प्रकरणाची दखल येथिल अधिकारी आपले हिंदूत्व जपत बौद्ध समाजांस न्याय देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे
बौद्ध समाज यामुळे खुप हतबल झाला आहे आता हाताला काम नाही,या महागाई दुनियेत दिवस कसे काढावे हे समजत नसतांना देखिल बहिष्कृत होवून जवळजवळ१०महीने उलटले तरी कुठलीच कार्यवाही कुणावर ही झाली नाही आम्हाला जानुन आर्थिक दडपणात आणण्याचे हे प्रयत्न होते आहेत जी बचत होती ती कधी पर्यंत पुरणार आता सबंध बौद्ध समाज या आर्थिक तंगी ला त्रासला असून जिल्हा प्रशासनास बौद्ध समाजांचे झालेले आर्थिक नुकसान भरून मागत असून ह्या बहिष्कारात येथिल लोकं चांगल्या मनाने एकत्र येतील हे अशक्य च म्हणजे आमच्या हाताला काम मिळेल हे ही अशक्य च म्हणून कुटुंबात एका व्यक्ति स नौकरी मिळावी म्हणून अर्ज करण्यात आले
या सगळ्यात आम्हाला खुप काही सोसावे लागले यात आमचा मान-सम्मान दावनीला लागला आणि जर प्रशासन हि दुर्लक्ष करेल तर आम्ही कुणाकडे दाद मागायची? कुणाकडे आम्ही आमचे गर्हाने सांगायचे? कुणाकडे???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here