मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड.

मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड.

पूलाला पडलेले भगदाड गिट्टी टाकून बुजवल्याने पूला खालून जाणारे पाणी चालले पुलावरून

माहूर तालुक्यातील नळकांडी बुटक्या पूलांची दैनी अवस्था

आदीत्य खंदारे
शहर प्रतिनिधी
7350030243

माहूर :- माहूर शहरापासून सारखणी महामार्गावरून तीन किमी अंतरावर असलेले मौजे मेट या दुर्गम परिसरातील गावाला जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालील नळकांडे फुटल्याने सदरील पूल जीव घेना बनला होता नागरिकांनी यापुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या पूलाची उंची वाढवून नवीन पूल बनविणे ऐवजी या फुलाला पडलेले भगदाड गीट्टी टाकून बुजविल्याने पुलाखालून जाणारे पाणी पुलावरून जात असल्याने वाटसरूंच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे
माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून खेड्यापाड्याला जाणारे अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेक ठिकाणी उंची वाढवून पिलर चे पूल बनविणे ऐवजी नळकांडे टाकून त्यावर मुरूम टाकून पूल बनविले गेले असल्याने जवळपास सर्वच मार्गावरील पूल तुटले किंवा त्यांना भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी पुन्हा पुन्हा काम करता यावे म्हणून अशा पूलांची निर्मिती केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग खासदार निधी आमदार निधी या सर्व निधी मधून झालेले रस्ते किंवा पूल अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांना वाहने चालविण्यासाठी अडचणी येत असल्याने छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचा वेळ पैसा वाया जात कायमस्वरूपी दुखापती करून घ्याव्या लागत आहेत त्यामुळे मौजे मेट या रस्त्यावरील नळकांडी आणि बुटक्या फुलाची उंची वाढवून नागरिकांच्या जीवाला होणारा धोका टाळावा अशी मागणी मौजे मेट येथील सरपंच सौ यशोदा येरमे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी के एस कराड धम्मपाल मुनेश्वर यांनी निवेदनाद्वारे केली आहे