*महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना यूपी पोलिसांनी आझमगड सीमेवर ताब्यात घेतलं! नागपुर काँग्रेस कडून त्याचा निषेध करण्यात आला*

56

नागपुर : – पल्लवी मेश्राम अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशच्या आझमगडच्या सीमेवर रोखून ताब्यात घेतलं. दलित सरपंचाच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नितीन राऊत उत्तर प्रदेश मधिल बासा गावात जात होते. त्यांंना उत्तर प्रदेश पोलिसानी ताब्यात घेतल, आज नागपूर काँग्रेस कमेटी तर्फे काळे झेंडे दाखवुन यूपी सरकार आणी यूपी पोलिसांंचा निषेध करण्यात आला. या निषेध मोर्चाचे नेतुत्व जिल्हाध्यक्ष पल्लवी मेश्राम, दियना लिगेकर, रेश्मा नंदागवळी, मंगला गणवीर माया घोरपाडे यांंनी केल
डॉ. नितीन राऊत हे आझमगड सीमेवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. आपल्याला बांसा इथे जायचं आहे, असं राऊतांनी पोलिसांना सांगितलं. परंतु बांसामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं यानंतर आझमगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि सर्किट हाऊस इथे नेलं.
काय आहे प्रकरण?
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशच्या आझमगडच्या बांसा गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी नितीन राऊत जात होते.
अनुसूचित जाती- अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ राऊत यांनी देशभरात दलितांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा विभाग पीडितांसाठी मदतीसाठी तत्परतेने काम करत आहे. तसंच त्यांना तात्काळ न्याय मिळेस यासाठीही काम करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणाच्या सत्य-शोध समितीमध्ये सामील करण्यात आलं आहे.

                                                                                                         -प्रशांत जगताप