विहिरीचे दुरुस्तीकरण न करताच उचलण्यात आली रक्कम रोहयोच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार

✍साहिल महाजन ✍
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
9309747836
यवतमाळ पांढरकवडा:- पंचायत समिती अंतर्गतच्या वांजरी गटग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनांच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. प्रशासनाणी अजून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. वांजरीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर दुरुस्तीकरणाकरिता मंजूर झाली. परंतु त्या विहिरीचे काम न करता बिल काढून रक्कम उचल करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांच्या मुलाने आपले सरकार महापोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.
रोजगार हमी योजने अंतर्गत वांजरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या श्री राजू रामलू गुडेवार यांच्या शेतातील विहीर बुजलेली होती. त्या रोजगारहमीतून खचलेली व बुजलेली विहीर दुरुस्तीकरण करण्याकरिता ग्रा.प. कडे अर्ज केला होता.सन 2018-19 मध्ये राजू रामलू गुडेवार यांच्या शेतातील खचलेली व बुजलेली विहीर दुरुस्तीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. व देयक सुद्धा उचलण्यात आले आहे.प्रत्यक्षात मात्र राजू गुडेवार यांची खचलेली व बुजलेली विहीर दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून श्री राजु गुडेवार हे खचलेली व बुजलेली विहीर दुरुस्त करून द्यावी यासाठी ग्रा.प. आणि पंचायत समिती पांढरकवडा कार्यालयात चकरा मारीत आहे. अधिकारी त्यांना आज करू उद्या करू असे म्हणून त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. गावातील राजकीय ठेकेदाराने त्यांची रक्कम लंपास(फस्त)केली आहे. यामध्ये ग्रा.प.चे तत्कालीन पदाधिकारी तथा ग्रामसेवकांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती महादेव गुडेवार यांना माहीत होताच त्यांनी आपली तक्रार महापोर्टल वर प्राप्त होताच गटविकास अधिकारी यांना दिली त्यांनी ग्रा.प.च्या सचिवास पुढील कार्यवाही करण्याकरिता मोजमाप पुस्तिका व फाईल प.स.मध्ये सादर करण्याकरीता पत्र दिले परंतु अजून पर्यंत मोजपुस्तिका व फाईल प.स. कार्यालयात सादर केलेली नाही. अजून गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकावर कार्यवाही केलीली नाही. त्यामुळे या प्रकरणात नीट लक्ष देण्याची मागणी महादेव गुडेवार यांनी केली आहे. काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.