*लसीकरण या कार्यक्रमा निमित्त नागपूर-अमरावती विभागाला 200 लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा*

✒त्रिशा राऊत✒
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : -आज लसीकरण या कार्यक्रमा निमित्त नागपूर-अमरावती विभागाला 200 लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा पार पडला त्यावेळी मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.ना.श्री. नितीन राऊत साहेब (उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.ना.श्री.राजेशजी टोपे (आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य) हे सुद्धा दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. व मा.ना.श्री. सुनीलजी केदार पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य व इतर सर्व नागरिक व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करून पूर्वस्थितीत आणण्याचे प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे अशे आव्हानं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी केले.