पोलीस स्टेशन नागभिड च्या वतिने रांगोली स्पर्धा संपन्न
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड—- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात तसेच या लढ्यातील क्रांतिकारक व अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनाचें स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने टिचर सोसायटी सभागृह नागभिड येथे पोलीस स्टेशन नागभिड च्या वतिने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.रांगोळी स्पर्धेत टिंवकल स्कूल नागभिड, जनता कन्या विद्यालय नागभिड, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागभिड येथिल , विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.रांगोळी स्पर्धाचे परिक्षक प्रा. सौ. संगिता मत्ते, प्रा.सौ.रंजना मेश्राम, प्रा.कु.अश्विनी सोनवणे जनता कनिष्ठ महाविद्यालय नागभीड यांनी रांगोळीचे परिक्षण करुन वैयक्तिक प्रथम क्रमांक – सलोनी मांढरे जनता कन्या विद्यालय,द्वितीय क्रमांक- कु. सिध्दी धकाते,तृतिय क्रमांक- कु.आचल सडमाके तसेच सामुहिक गृपमध्ये प्रथम क्रमांक- कु. विशाखा नन्नावरे व गृप द्वितीय क्रमांक – अंजली प्रधान व गृप,तृतिय क्रमांक-कु.खुषबु मेंढे व गृप यांना प्रोत्साहनपर प्रथम क्रमांक-2001/-रुपये ,द्वितीय क्रमांक- 1501/-रुपये व तृतिय क्रमांक 1001/-रुपयांचे बक्षीस देण्यात आले.सदर कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्य पोलीस स्टेशन नागभीड पोलीस निरिक्षक राजु मेंढे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम घेऊन स्वांतञ्य उत्साह साजरा करण्यात आले ,