नागेश्वर आवास येथे नागपंचमी सणानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी नागदेवतेचे दर्शन घेतले
✍️सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301
कोकण :-रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पूर्वी पासून प्रसिध्द असलेले श्री नागेश्वर आवास येथे श्रावणातील पहिला सण नागपंचमी सणानिमित्त आगरी कोळी, शेतकरी वर्ग व समाजातील सर्व धरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनाची सुरुवात झाली.आज दिवसभरात खारेपाट, अलिबाग, पोयनाड पेण, उरण, करंजा, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी परिसरातील भाविकांनी सुमारे ४० हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .महत्वाचे म्हणजे आगरी कोळी शेतकरी अशा सर्व स्थरातील भाविकांची आवास येथील नागेश्वर देवतेवर दृढ श्रद्धा आहे. नवसाला पावणारे देवस्थानवर भाविकांचा दृढ विश्वास आहे.अगदी लहानापासून थोरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत असतात या दिवशी याठिकाणी हार, फुले, मिठाईची दुकाने, कौटुंबिक वस्तु व लहान मुलांची खेळणी अश्या प्रकारची अनेक दुकानांची मांडणी केलेली असते.भाविक व महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने खरेदी करतात.
नाग पंचमीच्या दिवशी नागेश्वर आवास येथील सर्व भजन मंडळांनी भजने सादर केली.तसेच नागपंचमी धात्रणातील पहिल्या सोमवारी आल्याने दुग्ध शर्करा योग आल्याने भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला.महत्वाचे म्हणजे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राबविण्याकरिता मांडवा गागरी पोलिस ठाण्याचे राहाय्यक पोलिस निरिक्षक गोविंद पाटील व सर्व पोलीस कर्मचारी वर्ग , तसेच आवाराच्या पोलीस पाटील या योगेश म्हात्रे तसेच ग्रुप ग्रामपंचायत आवास सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मंडळ आवास या सर्वांचे चांगले सहकार्य लाभले.