सापांना जीवदान देणाऱ्या सर्प मित्रांचे योगदान मोलाचे…!

   श्रावण महिन्यात येणाऱ्या बरेच सणांपैकी महत्वाचा सण म्हणून ओळखल्या जाते तो सण म्हणजेच नागपंचमी सण होय. मोठ्या प्रमाणात जिकडे, तिकडे साजरा केला जातो.आजच्या दिवशी मुली,महिला वारूडापाशी जाऊन नाग देवतेची मोठ्या श्रध्देने, आस्थेने पूजा करतात. खास करून ते नागाला आपला भाऊ माणतात.असे अनेकदा ऐकण्यात आले आहे काही लोक म्हणतात की, नाग दुध पितो पण,सर्पमित्र सांगतात की,नाग कधीच दुध पित नाही सारी ही अंधश्रद्धा आहे. खास करून नागसाप बळीराजाचा मित्र आहे त्याच्या शेतात राहून उंदरांपासून होणाऱे नुकसान थांबवतो असो,हे सर्व ठीक आहे पण,साप दिसताच कोणाला भीती वाटत नाही नुसते त्याचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो जर ऐनवेळी साप दिसतास कोणी भाऊ किंवा बहीण किंवा शेजारी राहणारे लोक सापाला पकडण्यासाठी धावून येत नाही तर नुसते साप बघायला अनेक जण येऊन गर्दी करत असतात व दुरूनच बघत असतात त्यावेळी मग मदतीसाठी कोण येणार हा एक सर्वाना प्रश्न पडत असतो आणि ऐनवेळी त्यांना एका साहसी व्यक्तीची आठवण होते ते म्हणजेच सर्पमित्र होतं.

          स्वतः चे जीव धोक्यात घालून दुसऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी एका निष्पाप जीवाचे प्राण वाचविण्यासाठी रात्र असो किंवा बेरात्री,दिवसा स्वतः च्या खिशातील पैसे खर्च करून दुचाकीत पेट्रोल भरून दोघे तिघेजण मिळून ज्या ठिकाणाहून फोन आला तिकडे माणुसकीचा नाता ठेवून आपुलकीने धावून जातात ते सर्पमित्र असतात. समाजासाठी बरेच लोकांचे योगदान असतात पण,खऱ्या अर्थाने मोलाचे योगदान सर्पमित्रांचे सुद्धा आहेत पण, हे कोणालाही दिसत नाही नाही कारण त्यांना फक्त सर्पमित्र माहीत असतात पण त्यांना पूर्णपणे वाचत नाही म्हणून सर्पमित्र कळत नाही जर आजपर्यंत सर्पमित्र या समाजाला कळले असते किंवा त्यांनी दिलेले नि:स्वार्थ भावनेचे योगदान जाणले असते तर सर्पमित्रांची या जगात वेगळ्या प्रकारे ओळख निर्माण झाली असती पण, त्या प्रकारची ओळख होत नाही हीच फार मोठी शोकांतिका आहे. साप कितीही मोठा असेल तरी त्याला अगदी चतुराईने पकडून जंगलात नेऊन सोडतात त्याचे प्राण वाचवतात आणि अनेकांच्या मनातील भीती दूर करून माणुसकी धर्म निभावून दाखवतात अशा सर्पमित्र समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्या चा प्रत्येक जिल्हयातील जिल्ह्याधिकारी यांच्या हस्ते सर्पमित्रांचा सन्मान व्हायला पाहिजेत एवढेच नाही तर नेत्यांच्या हस्ते सुद्धा सन्मान व्हायला पाहिजेत, गावात,किंवा शहरात सामाजिक कार्यक्रम होत असतील तेथे सुद्धा त्यांना मानाचे स्थान मिळायला पाहिजे कारण, सर्पमित्रांना शासनाकडून कोणतेही मानधन मिळत नाही आणि ज्या घरी साप निघाला असतो त्या घरी जाऊन जेव्हा ते साप पकडून संकट दूर करतात त्यांच्याकडूनही रुपयाची मदत मिळत नाही कारण सर्पमित्र कोणालाही पैसे मागत नाही तर माणुसकीच्या नात्याने नि:स्वार्थ भावनेने मोलाचे कार्य करून दाखवतात अशा माणुसकीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यांची कोणीही दखल घेत नाही किंवा घरी असो किंवा एखाद्या शासकीय ठिकाणी साप निघाला की त्यांना बोलवतात पण, एकदा ते साप पकडून नेले की लगेच त्यांना विसरून जातात असा हा स्वार्थी समाज आहे. जे,समाजाच्या हितासाठी चांगले कार्य करतात त्यांचा विसर पडत असतो व जे, प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिखावूपणाचे थोडे कार्य करून दाखवतात त्यांचा मात्र उदोउदो केला जातो.

     उदा. आज जर सर्पमित्र नसते तर कितीतरी सापांचे प्राण गेले असते कारण ते, सापांना फक्त, वैरी समजतात पण,कोणतेही प्राणी असोत किंवा कीडे,सरपटणारे जीव कोणाचेही वैरी नसतात जेव्हा बोलता, चालता माणूसच निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करून पशूंना लाज वाटेल एवढ्या खालच्या पातळीवर जावून वागत असेल तर दंड तर सांपाकडून असो किंवा इतर प्राण्यांकडून मिळणारच आहे हे, सत्य आहे म्हणून जे,कोणी आजकाल योग्य कार्य करत आहेत त्यांचा पूर्णपणे विसर पडलेला दिसत आहे त्यातील सर्पमित्र सुद्धा आहेत ते, अजूनही समाजाला कळले नाही म्हणून त्यांची कोणी कदर करत नाही व दखल घेतली जात नाही. बरेचदा सर्पमित्रांशी माझं बोलणं होत असते त्यांचे कार्य व त्यांच्यात असलेल्या माणुसकी बद्दल मला अभिमान वाटतो म्हणून आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांच्यावर लेख लिहिण्याचे मला भाग्य लाभले आहेत कारण ते, स्वार्थी नाही तर नि:स्वार्थी होऊन समाजाला विशेष योगदान देत आहेत प्राण वाचविणाऱ्याला प्राणदाता म्हणतात व स्वतः साठी जगतात त्यांना स्वार्थी म्हणतात असे हे, नि:स्वार्थी प्राण दाते महान समाजकार्य करणारे सर्पमित्र आहेत. 

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here