कापडे विभागात शिवसेना वतीने बांधकाम कामगार योजना कॅम्प उत्साहात संपन्न
मंत्री भरतशेठ गोगावले व विकास शेठ गोगावले यांचे कामगार वर्गाकडून मानले आभार
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर (ता. पोलादपूर): – महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकहिताय योजना बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा सर्वसामान्य कामगारांना लाभ मिळावा या उद्देशाने, शिवसेना व युवा सेनेच्यावतीने एक विशेष कॅम्प पोलादपूर येथील कापडे विभागात आयोजित करण्यात आला.
या कॅम्पचे आयोजन रोहयो मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या विशेष सहकार्याने व युवा सेना कोअर कमिटी सदस्य श्री. विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विधानसभा क्षेत्रात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून करण्यात आले.
या उपक्रमात रानबाजीरे व आदिवासी वाडी येथील असंघटित बांधकाम कामगारांना एकत्र करून, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली व त्यांची बांधकाम कामगार योजनेत नोंदणी करून त्यांना अधिकृत लाभार्थी करण्यात आले.
कॅम्पमध्ये खालील योजनांची माहिती व नोंदणी सेवा काम योजनादूत समन्वयक श्री इंद्रनील पाटील यांनी
बांधकाम कामगार योजना,
घरेलू कामगार योजना,
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ,आयुष्मान भारत कार्ड
अन्नपूर्णा योजना,
फार्मर आयडी तयार करणे,
पॅन कार्ड व आधार कार्ड अपडेट करणे ,,वयोश्री योजना,तीर्थदर्शन योजना याचीही माहिती दिली
कार्यक्रमाचे स्थानिक शिवसैनिक व परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शेवटी उपस्थितांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि भविष्यातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.