*कोरोनाने घेतला 32 वर्षीय गर्भवती महिला डॉक्टरचा बळी*
रुग्णालयात सेवा देताना झाली होती कोरोनाची लागण, 5 दिवसांपूर्वीच गमावलं होतं सात महिन्यांच बाळ
अमरावती:- आज एक 32 वर्षीय गर्भवती महिला डॉक्टरचा कोरोनाने बळी घेतला महिला डॉक्टरच्या मृत्यु मुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. कोरोनावर मात करुन अनेक रुग्ण बरे होत असले तरीही अनेकांचा यामध्ये मृत्यू होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत 32 वर्षीय गर्भवती वैद्यकीय अधिकारी महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दुःखद म्हणजे 5 दिवसांपूर्वीच या महिलेने आपलं बाळ गमावलं होतं.
कोरोना काळात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहेत. रुग्ण सेवा करताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. यामधील बऱ्याच डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत युवा गर्भवती डॉक्टर महिलेचाही कोरोनाने बळी घेतला आहे. अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजी विभागात डॉ प्रतिक्षा वालदेकर (MBBS , MD) या कार्यरत होत्या. धक्कादायक म्हणचे त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.
सुरुवातीला डॉ. प्रतिक्षा यांना अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर त्यांना नागपूरला शिफ्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती बिघडत होती. 10 दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यांना ऑक्सिजन लावले होते. याच काळात उपचार सुरू असतानाच 5 दिवसांपूर्वीच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. यानंतर उपचारादरम्यान नागपुरात रात्री उशीरा त्यांनीही जीव गमवला.