करोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू, सेवा देण्याचा ऐवजी डॉक्टर बनले यमराज

58

*करोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू, सेवा देण्याचा ऐवजी डॉक्टर बनले यमराज*

मुलाची हाक डॉक्टरांनी ऐकलीच नाही

नागपुर:- आज कोरोना वायरसच्या नावावर रुग्ण सेवेचा नावावर डॉक्टरांचा चेहरा हा यमदुता सारखा दिसत असल्याची ओरड आहे. ज्या डॉक्टर वर जिवन वाचवण्याची जाबबदारी आहे. तो डॉक्टर आज रुग्णाना मरनाच्या दारात वा-यावर सोडत आहे. नागपुर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यावर एका रुग्णाला ऑक्सिजन व औषधांची गरज होती. त्यांचा मुलगा वारंवार डॉक्टरांना माझ्या वडिलांकडे लक्ष द्या हो.. अशी विनवणी करीत होता. परंतु तेथील डॉक्टर आणि परिचारिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर त्या रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला.
मिलिंद हरताळकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शिक्षक सहकारी बँकेत कार्यरत होते. मिलिंद हरताळकर करोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रामदासपेठ व धंतोलीतील अनेक खासगी रुग्णालयात संपर्क साधण्यात आला. मात्र प्रत्येक ठिकाणी खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अखेर त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्रारंभी ऑक्सिजन दिले. त्यामुळे काही काळ आराम वाटला. मात्र बुधवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली तरीही ऑक्सिजन त्यांना लावण्यात आले नाही. त्यांना खासगी रग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय काही रुग्णालयात खाटा उपलब्ध आहे का म्हणून चौकशी करत फिरत होते. इकडे त्यांची प्रकृती अधिक बिघडत चालली होती.
हे बघून त्यांच्या मुलाने डॉक्टरांना माझ्या वडिलांकडे लक्ष द्या, अशी वारंवार विनंती केली. मात्र डॉक्टर वेळेवर पोहचले नाहीत. अखेर मिलिंद हरताळकर यांनी उपचाराअभावी तडफडून प्राण सोडला. माझ्या वडिलांकडे वेळीच लक्ष दिले असते तर ते वाचले असते. मात्र शासकीय रुग्णालयात आवश्यक काळजी घेतली गेली नाही, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.