आरोग्य पथकाची जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई
दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा, २१/०९/२१
गावात तसेच आजुबाजुच्या परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असुन सोमवार ,२० रोजी आरोग्य पथकाने बोगस डॉक्टरांची चौकशी करून आष्टी तालुक्यातील साहूर येथील डॉ. इंगळे यांच्या रुग्णालयाला सील करण्यात आले. वाढोणा येथे काल एका तर आज २१ रोजी पुलगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्या रसुलाबाद येथे बोगस डॉक्टरच्या दवाखान्याला टाळे ठोकण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार गावात व गावाच्या आजुबाजूला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून कोरोनाचा फायदा घेत या डॉक्टरांनी आपले दुकान थाटून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची लुट केली. दरम्यान, अनेकांना जीवही गमवावा लागला. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव असल्याचे त्याच्या शिक्षणासंदर्भात कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही. दरम्यान, २० रोजी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत डॉ. इंगळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेत भंडाफोड करत रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले.
कारवाईचे सत्र सुरू राहणार असून अशा बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पाळले जाणार असल्याचे पथकातील डॉ. भागवत राऊत यांनी सांगितले. बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी जिलाधिकार्यांनी आदेश दिला आहे. तळेगाव (श्या.पंत) येथे बोगस डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. तर खडकी येथेही एका बोगस डॉक्टरवर कारवाही करण्यात आली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर त्याचे नाव कळू शकले नाही.