चंद्रपुर बल्लारपूर मार्गावर वाढले अपघात चे प्रमाण अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेला दिली जोरदार धडक  महिलेचा जागीच मृत्यू

52

चंद्रपुर बल्लारपूर मार्गावर वाढले अपघात चे प्रमाण

अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेला दिली जोरदार धडक  महिलेचा जागीच मृत्यू

चंद्रपुर बल्लारपूर मार्गावर वाढले अपघात चे प्रमाण अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेला दिली जोरदार धडक  महिलेचा जागीच मृत्यू
चंद्रपुर बल्लारपूर मार्गावर वाढले अपघात चे प्रमाण
अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेला दिली जोरदार धडक  महिलेचा जागीच मृत्यू

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809

चंद्रपूर- बाबुपेठ बहल्लारशा हायवे वर आज दि. २१/०९/२१ दुपारी २.४० एका अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेला दिली जोरदार धडक त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी त्या महिलेचे नातेवाईक आले असून त्यांच्या सांगण्याप्रमाणे हि महिला सावली ह्या गावची असून आपल्या भावाच्या घरी आली होती वापस जायला निघाली असता आपल्या पुतण्याला भेटायला जात होती गावाला जाण्यास बसस्थानक कडे निघाली होती परन्तु तिला वाटले की मधेच जवळपास पुतण्या राहतो त्याला भेटून जावे म्हणून ती एकटीच घरून निघाली होती तिची नातीन ती बसस्टॉपवर नेऊन सोडणार होती. पुतण्या जवळपास राहत असल्याने ती भेटायला निघाली होती परंतु नियतीने तिच्यासाठी काहीतरी दुसरेच लिहिले होते घरून निघाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत अज्ञात वाहनाने तिला चिरडून टाकले आणि त्यात तिचे जागीच मृत्यू झाला तिने जागाचा निरोप घेतला संतापलेली जनता येणार जाणार वाहनांना थांबवून आपला राग व्यक्त करीत आहे धडक दिलेल्या वाहनाचा शोध घेतला पाहिजे योग्य चौकशी केली पाहिजे म्हणून जमाव झालेली लोक तिला उचलू देत नाही आहे घटनास्थळी पोलीस व शववाहिका आली असून पोलिसांचा पंचनामा सुरू आहे पुढील माहिती तपास सुरू आहे.