धाबा-तोहोगाव आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी तथा चष्मे वाटप शिबीर

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
धाबा – तोहगाव जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या धाबा आणि तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात आले.तोहगाव येथिल शिबिरात ३४२ तर धाबा येथे ३५७ जणांची नेत्र तपासणी करून चष्मा देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.वैष्णवी अमर बोडलावार,जि. प. सदस्या,चंद्रपूर यांचा हस्ते पार पडले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचा सदस्या सौ.स्वाती वडपल्लीवार ,सरपंचा सौ.अमावश्याताई ताडे, प्रकाश
उत्तरवार, सूरेंद्र चोचले, विजय शेरकूरवार,अमर बोडलावार, डाॕ.स्नेहल डाहूले,डाॕ.प्रदिप लोणे,डाॕ.आसूटकर,डाॕ.जवळे तथा कर्मचारी उपस्थित होते.