काही प्रस्तावात त्रुटया असल्याने प्रकरणे मंजुर झाली नसली तरीही याचा पाठपुरावा करुन तत्काळ मंजुर केली जातील असे आश्वासन आमदार कुणावार यांनी याप्रसंगी संबोधित करतांना दिले.

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,उपजिल्हाधिकारी अवथरे,तहसीलदार राजू रणवीर इत्यादिसह माजी नगराध्यक्ष गजानन राऊत इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
आज कार्यक्रमप्रसंगी शिवणी येथील झुजाब कोष्टगन पवार, लालचंद उज्जैन काळे,श्रीमती सुशीला कोष्टगन पवार, प्रभाकर जळोजी कन्नाके मु.पिंपरी,कवठा येथील जंगलु धर्मा मसराम,देवराव महादेव धुर्वे, शिवणी येथील बंडू वैशा पवार, सौ ललिता विकास पवार, हिवरा येथील छगन सिंग जानबा भोसले, बुटर मंगल पवार या आदिवासी बांधवाना वन जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचेवेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे प्रती कुटुंब २० हजार रुपयांचे धनादेश प्रमाणे सन्माननीय आमदार महोदयांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यात तालुक्यातील प्रज्ञा प्रमोद देवडे मु.सुजातपूर ,कल्पना अनिल डांगे मु. फरीदपूर,काजल राजू भोयर मु.शेगाव (गो), कल्पना प्रमोद भगत,मु.गिरड, ज्योती मंगेश वटे मु. कवठा,कांता दिलीप डोंगरे मु.वायगाव (गोंड),संगीता लहुदास अंबाडरे,मु.भगवानपुर, संगीता रामचंद्र घोगरे, समुद्रपूर, पुष्पा बालाजी सोनवणे मु.जाम निशाताई किसन जाधव मु. भोसा तसेच जाम येथील सुनंदा अनिल शर्मा यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमप्रसंगी नायब तहसीलदार संजय महाजन, सयाम साहेब,किरसान साहेब इत्यादि अधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ता बालू इंगोले हजर होते.