काम मागायला गेलेल्या तरूणाला भाजपाचा माजी सभापतीची मारहाण ; तक्रार घेण्यास ठाणेदाराचा नकार

48

काम मागायला गेलेल्या तरूणाला भाजपाचा माजी सभापतीची मारहाण ; तक्रार घेण्यास ठाणेदाराचा नकार

काम मागायला गेलेल्या तरूणाला भाजपाचा माजी सभापतीची मारहाण ; तक्रार घेण्यास ठाणेदाराचा नकार
काम मागायला गेलेल्या तरूणाला भाजपाचा माजी सभापतीची मारहाण ; तक्रार घेण्यास ठाणेदाराचा नकार

राजू ( राजेंद्र ) झाडे

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:-काम मागायला गेलेल्या गावातील तरूणाला भाजपाचा माजी सभापतीने मारहाण केली.गावात आलेल्या ठाणेदारानेही झोडपले.तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेला असता तिथेही जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप सोनापूर येथिल विजय येवले यांनी लावला आहे.पत्रकार परिषदेत येवले यांनी आपबीत्ती कथन केली.दरम्यान माजी सभापती दिपक सातपुते यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले .

गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) येथील विजय येवले (वय ३५ ) यांनी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य दिपक सातपुते यांचे घर गाठून कामाची मागणी केली.
गावात अनेक कामे सुरू आहेत. मला देखील कामावर घ्या.मी देखील तुम्हचा कार्यकर्ता आहे.मात्र काम नाही,असे उत्तर सातपुते यांनी दिले.त्यानंतर देखील येवले यांनी कामासाठी तगादा लावला.यामुळे चिडलेल्या दिपक सातपुते यांनी येवले याला बेदम मारहाण केली.तिथे उपस्थित असलेल्या काही सहकाऱ्यांना बोलावून मारायला लावल्याचा येवले यांचा आरोप आहे.सरपंचा जया सातपुते, बळीराम एकोनकर, सुवर्णा एकोनकर,वासुदेव ऐकोनकर,मोहन चौधरी यांनी दिपक सातपुतेचा सांगण्यावरून मारहाण केल्याचे येवलेनी पत्रकार परिषदेत सांगितले.सातपुतेनी लाठी येथील ठाणेदार पारडकर यांना घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. ठाणेदाराने घटनास्थळ गाठले.ठाणेदारांनी दहा ते बारा काठ्या येवले यांना मारल्या.या मारहाणीने येवले यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना 12 सप्टेंबरचा रात्रौ आठ वाजताचा दरम्यान घडली.अंग सूजल्याने येवले घराच्या बाहेर निघू शकले नाही.त्यानंतर 14 सप्टेंबरला येवले यांनी लाठी पोलीस स्टेशन गाठले. मारहाणीची तक्रार द्यायला गेले.मात्र तक्रार न घेता ठाणेदार पराडकर यांनी ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप येवले यांनी केला आहे.दरम्यान दिपक सातपुते,त्याचे सहकारी तथा लाठी ठाणेदारावर कार्यवाही करावी , अशी मागणी येवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर व पोलिस अधिक्षक राजुरा यांच्याकडे केली आहे. अशी माहिती विजय सदाशिव येवले यांनी गोंडपिपरी येथील पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान याबाबत माजी सभापती दिपक सातपुते यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले ” घरी गणपतीची आरती सूरू असतांना येवले यांनी अंगणात येऊन शिवीगाड केली.त्याला प्रेमाने बाहेर जाण्यास सांगितले.मी अथवा माझ्या कोणत्याच सहकार्याने मारहाण केली नाही. ”

मारहाणीचा आरोप खोटा

दोघांचाही तक्रारी पोलीस स्टेशानला प्राप्त झाल्या आहेत.मि मारहाण केली नाही.माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही.

ठाणेदार- मिलिंद पारडकर (पो.स्टे. लाठी)