पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची ग्रीन आम्बेंसिडर महाराष्ट्र म्हणुन निवड

53

पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची ग्रीन आम्बेंसिडर महाराष्ट्र म्हणुन निवड

पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची ग्रीन आम्बेंसिडर महाराष्ट्र म्हणुन निवड
पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची ग्रीन आम्बेंसिडर महाराष्ट्र म्हणुन निवड

✍🏻राम राठोड ✍🏻
मानोरा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9422160416

तालुक्यातील माहुली येथील पक्षीप्रेमी वृक्षप्रेमी कविवर्य राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार अवार्डने सन्मानित असलेले राज्य राखीव पोलीस बल गट क्र ०४ नागपूर याठीकाणी पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले पोलीस अमंलदार पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची नुकतीच पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ग्रीन इंडिया परिवार रिसर्च फाउंडेशन बिहार ,भारत चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डाँ.निरज गुप्ता सर यांनी सुमित राठोड यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कार्य पाहता त्यांची ग्रीन आम्बेंंसिडर महाराष्ट्र राज्या करिता निवड करण्यात आली आहे सुमित राठोड पोलीस बलात राहुन आपले खंडतर कर्तव्याबरोबर विविध छंद जोपासतात मागील तीन वर्षापासुन शुभेच्यारुपी एक वृक्षारोपण हा उपक्रम व पक्षीसाठी टाकाऊ वस्तु पासुन कृत्रिम घर व अन्नपाणपोई तयार करून विविध ठीकाणी बसवने असे कार्य करतात वृक्षा बद्दल कार्यशाळा आयोजन करुन वृक्षाबद्दल माहीती त्यांचे महत्व जास्त प्रमाणात प्राणवायु देणारे वृक्षाविषयी माहीती आणी लहान मुलाच्या मनात आतापासुन वृक्षप्रेम निर्माण व्हावे म्हणुन लहान मुलाना सुद्धा माहीती देतात तसेच वृक्ष लागवडीसाठी सर्वात साधा आणि सोपा मार्ग म्हणजे सिड्सबाँल तयार करण्याची कला अवगत करून देत आहे कमी वेळात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होते आणी निसर्ग संवर्धनाला हातभार लागेल याशिवाय ते बरीच वृक्ष ईतराना भेट स्वरुपात सुद्धा देतात आजवर त्यांनी हजारोच्या संख्यने विविध फळाची व जास्त प्रमाणात प्राणवायु देणारे वृक्षाची लागवड केली आहे उन्हाळ्यात विविध वृक्षाचे बीया संकलन करुन ते स्वता रोप सुद्धा तयार करतात व तेच रोप लागवड व भेट देण्यासाठी व कार्यशाळा साठी उपयोगात आनतात महत्वाची बाब ही सर्व वृक्ष व त्यासाठी लागणारे सर्व साहीत्य स्वखर्चाने आनतात व खर्च करातात अश्या ध्येय वेड्या पर्यावरणप्रेमी चा ग्रीन इंडिया परिवार रिसर्च फाउंडेश बिहार ,भारत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डाँ.नीरज गुप्ता सर यांनी पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांची ग्रीन आम्बेंसिडर महाराष्ट्र राज्य साठी निवड केली आहे सुमित राठोड यांनी ग्रीन इंडिया परिवार रिसर्च फाउंडेशन , बिहार भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डाँ.निरज गुप्ता सर व सर्व पदाधिकारी यांचे मनापासार आभार व्यक्त केले आहे आणी ज्या प्रमाणे माझे कार्य पहीले चालु होते तसेच कार्य निरंतर चालू राहणार असल्याचे सागितले