वढा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

42

वढा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

वढा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
वढा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या वढा गावा पासून दोन किमी. अंतरावर पूर्वेस वर्धा नदीच्या किनाऱ्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
सोमवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी दरम्यान एका इसमाचा मृतदेह तरंगतांना गावातील एका इसमास दिसला ही माहिती घुग्घुस पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी चंद्रपूर येथून बचाव पथकास बोलाविले.
मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सकाळ पासून घुग्घुसचे सहा.पो.नि.संजय सिंग, पोहवा. बंडू मोरे, सचिन डोहे, चंद्रपूर बचाव पथकाचे मंगेश मत्ते, अशोक गर्गेलवार, दिलीप चव्हाण, रुपेश निरस्कर यांनी बोटीने शोध मोहीम राबविली असता एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह चंद्रपूर येथे पाठविला आहे.
पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.