पाचपावली पोलीस स्टेशन समोर तरुणाच्या मृतदेहासह कुटुंबीयांनी आंदोलन केले.

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी

मो 9096817953

 नागपूर.. पोलिस असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. शांतनु वालदे असे तरुणाचे नाव आहे. 

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनसमोर बुधवारी संध्याकाळी शांतनू वालदे या तरुणाच्या मृत्यूनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शांतनुने बुधवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शांतनुचे सासरे पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शांतनुला इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अमानुष मारहाण केली होती.त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनमध्येच शांतनूविरोधात खोटा गुन्हा नोंदवत त्याला अटक ही केली होती त्यामुळेच शांतनूला अपमानास्पद वाटत होते आणि तो तणावात होता. पोलीस असलेले सासरे रवी गजभिये आणि त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी शांतनूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा वालदे कुटुंबीयांचा आरोप आहे.

अटकेनंतर काल जामिनावर सुटका झाल्यानंतर शांतूने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर हा सर्व वाद निर्माण झाला. आज शांतनूच्या मृतदेह सह त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी पाचपावली पोलीस स्टेशन समोर बराच वेळ आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सध्या तरी तणाव निवळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here