मोटर सायकल चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना अटक

मोटर सायकल चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना अटक

मोटर सायकल चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना अटक

✍️विशाल सुरवाडे✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱मो.9595329191📱

जळगाव – दि.21 जळगाव जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना पोलीस अधीक्षक यांनी दिले. त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री गणेश वाघमारे, श्री दत्तात्रय पोटे, पोह गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिहऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकातील अमंलदार पोह विनोद पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, टाकरखेडा ता. जामनेर येथील १) विशोल गोपाल भोई, रा. टाकरखेडा ता. जामनेर हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. पथकातील अमंलदार यांनी सुरेश पाडवी हा त्याचे गावी टाकरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास टाकरखेडा येथून ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे अजुन त्याचे दोन साथीदार २) देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, ३) सुरज अशोक पारधी (सांळुखे), रा. टाकरखेडा ता.जामनेर जि.जळगाव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला, भुसावळ शहर पो.स्टे., जळगाव शहर पो.स्टे., जिल्हापेठ पो.स्टे.या जळगाव जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरीत २ मोटार सायकल यांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here